Wednesday, January 12, 2011

सवय


किती दाटीवाटीत राहतात
हि लोक
प्रश्न विचारे फ्लॅटवाले
एकमेकांना.

कसे इतके मोकळे
राहू शकतात
मनात असे प्रश्न
चाळवाल्यांच्या

सगळ्या वर एकच
उत्तर ज्याचा
त्याच्या सवयीचा
प्रश्न

3 comments:

 1. Hello,Namrata
  Thanks for informing about your passion of Poems and this blog also.I read all your poems on this blog.They are really good.Keep it up!
  Not everybody possess this capacity.
  --Rajashree Bam

  ReplyDelete
 2. Here is a wonderful poem.Hope you will like this.
  Rajashree Bam
  रक्‍ताच्या पेशीवर गोंदवलेली नसतात
  अशी काही नाती असतात
  मात्र रक्‍ताचा रंग लालजर्द असतो तो त्यांच्यामुळे
  उडणार्‍या नाडीला असते लय
  श्वासोच्छ्‍वासाला अर्थ मिळतो तो त्यांच्यामुळे
  आडरानातल्या तजेल वार्‍याच्या वाहणीसारखी
  किंवा
  दुखर्‍या एकाकी अंधारातल्या चांदणीसारखी
  ही अनाम नाती
  तान्ह्याच्या मुठीत सारलेल्या बोटाइतकी आश्वासक
  तान्हेल्या त्वचेवर झरणार्‍या थेंबाइतकी संजीवक
  उच्चारित, अनुच्चारित, कशीही,
  पण जगण्याचे अवघडपण पेलण्याचे बळ देणारी
  मागच्या पुढच्या भोगवट्याला श्रीफळ करुन जाणारी

  (अरुणा ढेरेंची कविता आहे)

  ReplyDelete
 3. Thank you madam for your inspirational words and poem

  Thanks
  Namrata

  ReplyDelete