Friday, December 31, 2010

सरते वर्ष

सरते क्षण
सरत्या आठवणी
छान न वाईट...
वाईट आठवणी
सोडूनी द्याव्यात,
छान आठवणी
घेऊनी चालव्यात,
नवीन वर्षाची
वाट बिकट
तरी ध्येयाने सामोरे जावे
नवीन चाहुल
नवीन क्षण
देई चैतन्याचा गोडवा
हळूहळू पालवी फुटेल
या नवीन वर्षाला

Saturday, December 25, 2010

कुणीतरी

कुणीतरी लागत
आपल्याला वेडं म्हणणारं
वेडं म्हणताना
आपल्यातलं शहाणपण जाणणारं
कुणीतरी लागत,
आपल्याला साथ देणारं
पडत असताना
अलगद तोल सावरणारं
कुणीतरी लागत,
आपलेपण जाणणारं
सुख दुःखच्या क्षणांना
हृदयात साठवणारं
कुणीतरी लागत,
नातं जपणारं
नात्यातील अश्रूंची
किमंत जाणणारं
कुणीतरी लागत,
आपल्याला आपलं म्हणणारं
दूर राहूनही
आपलं असणारं


क्षितिजं

दोन क्षितिजं समोरासमोर
रोज दिसे एकमेकांना
नसे दुसरी भेट नजरे शिवाय
म्हणती सर्व जण
"उभे असे जणू शत्रू सारखे"
दोन क्षितिजं कुजबुजती मना मधी
" आहे आमुचे प्रेम जरी आम्ही ध्रुवा सारखे"

Friday, December 17, 2010

चौथे पुण्यस्मरण




दिवस दिवस वाढत जातो
अंधारही थोडासा आशावादी होतो
एक पणती तेवत असते,
आठवण म्हणून श्रद्धांजलीसाठी
जागत असते!

Thursday, December 16, 2010

वटवृक्ष

पपा, तुम्ही एका वटवृक्षा सारखे
जरी उंच तुम्ही तरी सावली वटवृक्षा सारखी पसरलेली

हा कठोर हात असला तरी
पाठिवर फिरताना मायेचा स्पर्श देणारा

गोड गुलाबी थंडीत पांघरूण टाकताना
तुम्ही त्या आभाळा सारखे भासतात

जेव्हा रागावतात तेव्हाही
शब्दही मोती सारखे भासतात

माझा आनंद तुमचा आनंद
माझे अश्रू तुमचेही अश्रू
जणू तुमच्यात मी ....

मी न बोलता माझे शब्द तुम्हाला कळतात
माझ्या डोळ्यातील आसवे तुम्ही येण्याआधीच पुसतात,
माझा आनंद तुमचा डोळ्यातच दिसतो

आयुष्याच्या पुढच्या वळणाकडे
जाताना मी मागे बघत नाही
कारणं तुम्ही पाठीशी असालच

जरी घसरून पडले तरी
सावरायला पटकन तुम्हीच याल

जगाशी लढताना भीती नाही वाटत
माझ्या स्वछंदी मनाला तुम्हीच तर ओळखलत



Wednesday, December 15, 2010

दान

किती दिलंत तुम्ही मला ...
पण घेतल काहीच नाही
फक्तं देतच आलात...

आभाळा एवढे प्रेम,
धरणीएवढी छाया
फक्तं देतच आलात...

बोटाला धरून पहिलं
पाऊल टाकायला शिकवलं

पाटीवरती एक लिहायला
शिकवलं मला...

अक्षरांची ओळख तिथूनच झाली
आयुष्याच्या वळणावर
काटे काढून फुले पांघरली
माझ्यासाठी...

केव्हढा विश्वास दिला
या एका स्मित हास्याने..

माझ्या आनंदामध्ये स्वतःचे
अश्रू माझ्या नकळत पुसले...
तरी केवढ दिलत मला ..


Monday, December 6, 2010

अथांग आठवणी ..

स्वतःच्या परिने जीवन जगण्याची
येथे प्रत्येकाला संधी नसते.
प्रत्येक झाडाची नियती हिरवीगार नसते..

ओंजळीत घेवुन समुद्र दाखवता येत नाही.
निळ्याशार आकाशाचा अंत लागत नाही.
हाताने काढलेल्या फुलांना सुगंध येत नाही.
म्हणुन आठवणी कधी शब्दात व्यक्त करता येत नाही.

Monday, August 16, 2010

आठवणी...

आज माझ्या कवितेला शब्द अपूरे आहेत...
आठवण-आठवण म्हणजे काय असंत.
शब्दाची ती अस्पष्ट साठवण असते...
आज हे क्षणही अपूरे आहेत...
म्हणूनच आयुष्य ही अपुरेच म्हणायचं
प्रत्येक क्षण-आठवण सांगणं सोप नसत
म्हणूनच 'शब्द'सुद्धा अधुरा असतो ...
अधुर्‍या आयुष्याकडे बघताना
अश्रू मात्र पूर्ण होतो...

म्हणूनच ही आठवण पुन्हा जाग्या होतात,
प्रत्येक क्षण-वेळ अधुरीही असेल
पण ते पूर्ण करणं आपल्या हाती नसत...
आठवणी हितगुज करतात म्हणूनच

त्या कधी हसवतात तर कधी त्या रडवतात...
अन् म्हणूनच आठवणी अतृप्त जीवनाकडे
आशेने बघण्याचं सांगत असावं...

Sunday, July 18, 2010

आयुष्याचा जमाखर्च


इवल्याशा आयुष्यात खूप काही


हवं असतं ...............


पण हवे ते मिळत अस काही नसत


अन म्हणूनच आयुष्याचा जमाखर्च


मांडता येत नसतो.................!!!!


मन माझे ......

मन माझे या सदाफुलीसारखे

वार्‍याच्या दिशेने झुकणार..........

म्हणेल त्याप्रमाणे डोलणार........

तरीही सदा फुलणारं........

Saturday, June 19, 2010

पप्पा -- न संपणारे नाते

ब्लॉगवर प्रथम कविता लिहिते आहे. माझ्या आयुष्यातील स्फूर्ती असलेल्या पप्पावरील कवितांनी ..

द्वितीय स्मृती दिन 17/12/2008
----------------------------
तुमच्या हातचा तो
एक उबदार स्पर्श
निघून जाती त्या
फुलपाखरां सारखा
हातावरती सप्तरंग ठेवुनी

तृतीय स्मृती दिन 17/12/2009
----------------------------
या समईतील नंदादीपाप्रमाणे
असे हा स्मृति दिन,
या तुमच्या सुरेल आठवणी
असे आमुचा मांगल्याचा ठेवा |
------------------------------------------------------------------------------------